प्रस्थापित जातींनी पेटवलेल्या जाती-संघर्षांना संवैधानिक लोकशाही चौकटीत आणून जातीअंताकडे जाता येते. -प्रा. श्रावण देवरे यांचे प्रतिपादन

बहुजन संघटक चॅनलतर्फे समीक्षक डॉ. लता प्र.म. यांनी प्रा. श्रावण देवरे यांची मुलाखत ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतिकारक पर्व’’ या नवप्रकाशित ग्रंथावर 4 जानेवारी 2026 रोजी घेतली. 57 मिनिटे व 47 सेकंदांची यु-ट्युब लिंक पुढीलप्रमाणे-

1) ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षावर ग्रंथ लिहीण्याची गरज का भासली?

2) ग्रंथाचे प्रस्तावनाकार ऍड. प्रदीप ढोबळे व सहलेखक सुनिल खोब्रागडे यांच्या स्वतंत्र मुलाखतीतून ग्रंथाची भुमिका अधिक स्पष्ट होईल.

3) ओबीसी मराठा संघर्षातून जातीअंत कसा होणार?

4) प्रस्थापित ब्राह्मण-मराठा जातीतील नेत्यांना जाती-जातींमध्ये संघर्ष पेटवून देशाला ‘जाती-युद्धाच्या खाईत‘’ ढकलायचे आहे, कारण त्यामुळे जातीव्यवस्था अधिक भक्कम होते.

5) प्रस्थापित जातींनी पेटवलेल्या जाती-संघर्षांना संवैधानिक लोकशाही चौकटीत आणून जातीअंताकडे जाता येते.

6) कृत्रिम पद्धतीने निर्माण करण्यात आलेली जात नष्ट करता येते परंतू जात बदलता येत नाही.

7) जात्यंतर, सगे-सोयरे, क्रीमी लेयर व सरसकट आदि असांविधानिक शब्दांना आरक्षणाच्या कसोटीत बेकायदेशीरपणे घुसडून एकूणच दलित, आदिवासी व ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण केला जात आहे.

8) कोणत्याही आरक्षणाला पात्र होण्यासाठी रक्ताच्या नात्याची ‘‘वंशावळ’’ ही सर्वात महत्वाची कसोटी आहे. ओबीसींचे आरक्षण बळकावण्यासाठी मराठा जातीचे लोक आता ‘‘मराठा रक्ताची वंशावळ’’ नाकारून ‘‘कुणबी रक्ताची वंशावळ’’ स्वीकारीत आहेत. अशा स्वार्थी गोंधळाच्या परिस्थितीत खर्‍या बापाच्या रक्ताची खरी वंशावळ शोधण्यासाठी ‘‘DNA Test’’ हे एकमेव वैज्ञानिक साधन आहे, जे मराठ्यांचे कुणबीकरण करतांना वापरले जाणे बंधनकारक केले पाहिजे.

9) गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मुठभर मराठा जातीच्या आरक्षणासाठी हिंसक आंदोलने, जाळपोळ, मारहाण, दंगली यासारखे प्रकार वारंवार होत असून सत्तेचा गैरवापर, न्यायालयाचा अपमान व संविधान पायदळी तुडविण्याचा नीचपणा वारंवार केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडते आहे. महाराष्ट्रात शांतता नांदायची असेल तर मराठा आरक्षण विषयावर 100 वर्षांची बंदी घातली जाणे आवश्यक आहे.

राहूल खांडेकर, पुणे
-संपादक, बहुजन संघटक चॅनल
डॉ. लता प्रतिभा मधुकर, मुंबई
-मुलाखतकर्त्या, वैचारिक समिक्षक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top