‘‘सत्ताधारी ब्राह्मण मराठ्यांची ‘अश्र्लाघ्य’ युती ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेली आहे’’ आंबेडकरवादी विचारवंत सुनिल खोब्रागडे यांचे प्रतिपादन….

आंबेडकरवादी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार सुनिल खोब्रागडे यांनी ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारक पर्व’’ या ग्रंथावर व्यक्त केलेले विचार…. सुनिल खोब्रागडे हे या ग्रंथाचे सहलेखक आहेत.

1) भारत हा सभ्य लोकांचा देश नाही. जातीच्या नावाने टोळ्यांचे कडबोळे म्हणजे भारत देश होय!

2) जातींच्या टोळ्यांना एकत्र करून त्यांच्यात वर्गीय भान आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची संकल्पना मांडली

3) आरक्षण हे पोट भरण्यासाठी नसून योग्य प्रतिनिधित्वासाठी आहे.

4) मंडल आयोगप्रणित ओबीसी आरक्षणामुळे ओबीसी जातीत संघटितपणे वर्गीय भावना निर्माण होत आहे.

5) ओबीसींमध्ये वर्गीय भावना निर्माण होणे म्हणजे जातीअंताची क्रांती होणे, कारण वर्ग निर्माण होण्याच्या प्रक्रियेत जातीचा अंत निश्चित असतो.

6) ओबीसी जागृत व संघटित झाला तर ब्राह्मण व मराठ्यांची प्रस्थापित सत्ता धोक्यात येते.

7) ब्राह्मण व मराठा या दोन सत्ताधारी जातींची ‘अश्र्लाघ्य’ युती ओबीसी आरक्षण नष्ट करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत आहे.

8) मराठ्यांचे सरसकट कुणबीकरण करणारा 2 सप्टेंबर 2025 चा जी.आर. रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई करणे आवश्यक आहे.

9) ही लढाई केवळ ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी नाही तर एकूणच बाबासाहेबांची आरक्षण संकल्पना धोक्यात आलेली आहे. म्हणून सर्व दलित, आदिवासी व ओबीसींनी एकत्र येऊन लढले पाहिजे.

10) प्रा. श्रावण देवरे व मी आम्ही दोघांनी लिहीलेला हा ग्रंथ न्यायालयीन लढाई व रस्त्यावरची लढाईसाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे.

……………………………
‘‘ओबीसी मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारक पर्व’’ या ग्रंथावर एड. प्रदीप ढोबळे, ओबीसी नेते राजाराम पाटील व सहलेखक प्रा. श्रावण देवरे
यांनी व्यक्त केलेले विचार पुढीलप्रमाणे-
https://youtu.be/DvEeOxvYXE0

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top