ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष: जातीअंताचे क्रांतिकारी पर्व’ या ग्रंथाचे प्रकाशन 27 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात संपन्न झाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष एड. *प्रदीप ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, ओबीसी समिक्षक डॉ. लता प्र म, ओबीसी नेते राजाराम पाटील, एड. आनंद निरगुडे आदि मान्यवरांनी ग्रंथावर आपले विचार व्यक्त केलेत.
आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती निरगुडे म्हणाले की, ‘मराठा जात सत्ताधारी असल्याने ती देणारी जात आहे व सर्व मागास जाती घेणाऱ्या आहेत. त्यामुळे मराठा जात मागास असू शकत नाहीत.’
सुनील खोब्रागडे म्हणाले की, या ग्रंथात मी ‘कुणबी मराठा या दोन वेगळ्या जाती आहेत हे असंख्य ऐतिहासिक व सांस्कृतिक पुरावे देऊन सिद्ध केले आहे.’
एड. प्रदीप ढोबळे यांनी ग्रंथातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आधारित याचिका 2 सप्टेंबर 2025 चा जी. आर. रद्द करण्यासाठी दाखल केली असल्याची माहिती आपल्या भाषणात दिली. सदर पिटीशन प्रा श्रावण देवरे यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.
डॉ. लता प्र म आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, ‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष जातीअंताच्या दिशेने नेण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे.’
उपोषणकर्ते भरत निचिते यांचा ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ग्रंथ आकर्षक स्वरुपात छापून दिल्याबद्दल मान. अमृतराव काळोखे यांचा सत्कार करण्यात आला.
ओबीसी नेते धोंडू मानकर, प्रा नारायणराव काळेल, निनाद चेऊलकर, ओबीसी युवा नेते दत्ता विसाळे, डी. पी. महाले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-चंद्रकांत सोनवणे, संपादक

