लेखकः प्रा. श्रावण देवरे
मुल्यः रूपये 100– 70 रूपये मात्र
या पुस्तकात काय वाचाल?
1) विषम व शोषणग्रस्त असलेल्या कोणत्याही समाजात शोषणाची व्यवस्था कधी वर्गसंस्था असते, कधी जातीव्यवस्था तर कधी वंश-व्यवस्था! कोणत्याही दोन वर्गातील, दोन जातीतील किंवा दोन वंशातील व्यापक संघर्षाला शोषण-व्यवस्थाच कारणीभूत असते. आणी प्रत्येक शोषणव्यवस्थेला कोणता ना कोणता तरी तत्वज्ञानात्मक वैचारिक आधार असतोच! त्यामुळे शोषणव्यवस्थेला विरोध करणार्या दुर्बल समाजघटकालाही आपला लढा उभा करतांना तत्वज्ञानाची बैठक स्वीकारावी लागते, तरच तो जाती-संघर्ष जातीअंताकडे आगेकूच करीत असतो. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाला कधी दोन जातीतील संघर्ष दाखविला गेला तर कधी भुजबळ विरुद्ध जरांगे असा व्यक्तिगत संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न प्रस्थापित विद्वान व मिडियाने केलेला आहे, करीत आहेत.
या पुस्तकात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाला ओबीसी समाजघटक जातीअंताकडे कसा नेतो आहे, हे या पुस्तकात वाचा.
2) ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष कोणकोणत्या टप्प्यातून पुढे जात आहे, तो जन्मापासून अंतापर्यंतचा प्रवास जाणून घ्या या पुस्तकातून
3) ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षात कोण आहे संवैधानिक व नैतिक नायक व कोण आहे असंवैधानिक-अनैतिक खलनायक, जाणून घ्या या पुस्तकात ऐतिहासिक दाखल्यांसह!
4) स्वतःला पुरोगामी म्हणविणारे व काही स्वतःला जन्मजात क्रांतिकारक समजणारे समाजघटक सत्ताधारी दबंग जातीच्या हिंसाचाराला कसे घाबरलेत व कसे सरेंडर झालेत, वाचा या पुस्तकात.
5) सामी पेरियार यांचे यशस्वी असलेले जीवंत जात्यंतक तत्वज्ञान, सनातन-ब्राह्मणवादाला यशस्वीपणे गाडणारा, जाती-संघर्षाला व धार्मिक दंगलींना कायमचे नष्ट करणारा ओबीसी नेतृतवाखालील तामीळनाडू मॉडेल हाच एकमेव पर्याय संपूर्ण देशासमोर कसा आहे, हे समजून घ्या या पुस्तकातून!



Reviews
There are no reviews yet.